My Blog List

Sunday 5 February 2017

एस. डी. चव्हाण सर 04/01/17

   "एस.डी. चव्हाण (सर)
                                    ....एक दीपस्तंभ"

 
         भारतीय संस्कृतीत वाढदिवस साजरा करताना विशिष्ट टप्प्यांना महत्त्व देऊन त्याला नामाभिधान दिलेले आहे. त्यात वाढत्या वयाबरोबर जीवनाचीही गुणात्मक प्रगती अपेक्षित असते. पंचविसाव्या वाढदिवसाला रौप्यमहोत्सव म्हटले आहे. चांदीपेक्षा सोन्याचे मूल्य अधिक, म्हणूनच पन्नासाव्या वाढदिवसाला सुवर्णमहोत्सव म्हटले आहे. सोन्यापेक्षा हिरा अधिक मौल्यवान, शिवाय तेजस्वी, प्रकाश देणारा. इतरांचे जीवन उजळून टाकण्याची क्षमता असणारा. साठाव्या वाढदिवसाला हीरकमहोत्सव म्हटलं जातं ते यासाठीच. देव-दानवांनी अमृत लाभ होण्यासाठी समुद्रमंथन केलं. अमृतप्राशनाने अमरत्व प्राप्त होतं. "पंचाहत्तराव्या" वाढदिवशी आयुष्याचा हिशोब मांडण्याची वेळच येत नाही. कारण एखादी व्यक्ति प्रारंभापासून भारतीय संस्कृतीप्रमाणे व सामाजिक भान जपुन आयुष्य व्यतीत करत गेली, तर या वाढदिवशी कीर्तीरूपी अमरत्व लाभून "अमृतप्राशनाचं" समाधान लाभतं. हा वाढदिवस इतिहासात नोंद केला जातो. शिवाय हे त्या व्यक्तीला करावं लागत नाही, तर समाजच सारं करतो. असा वाढदिवस हा त्या व्यक्तीचा केवळ कौटुंबिक सोहळा न राहता सार्वजनिक आनंदाचा दिवस ठरतो.
           आज(4 जानेवारी 2017) एस डी सरांचा 75 वा वाढदिवस आहे अस समजल आणि मनात आल कि त्यांच्या बद्दल काहीतरी लिहावे. तस लिखाण करण हा माझा प्रांत नाही पण व्यक्तिच अशी आहे कि पेन घेतला व विचार सुचायला लागले. एसडी सर म्हणुन परिचीत असणारे 'तात्या' आज 75 व्या वर्षी सुद्धा तिशीच्या तरुणाला लाजवतील असे ऊत्साहि व आनंदी असतात. त्यांच्या कामाची शैली, त्यांचा प्रतेक कामातला उत्साह बघीतला कि वाटते कि, गावातील सामाजिक, धार्मिक, सुख- दुःख प्रसंग अश्या सर्व ठिकाणी जर गावातील प्रतेक तरुणांने जर सरांनसारखा भाग घेतला व कोणत्याही कार्यास आपलेसे केले तर आपले गाव एका वेगळ्या ऊंचीवर पोहचेल.
           आज सामाजिक स्थरावर भ्रष्टाचार, वाढती व्यसनाधिनता, वाढता चंगळवाद, समाजात वाढत असणारी आत्मकेंद्री वृत्ती, राजकीय पतन या सर्वामुळे जीवनमूल्यांचा, आदर्षांचा, मानुसकिचा होणारा र्हास जेव्हा समोर दिसत असतो, तेव्हा पाठिवरती हात ठेऊन "लढ" म्हणनार कोणीतरी हवं असतं. आज एसडी सर मला असेच वाटतात. कोणत्याही चांगल्या कार्यक्रम उपक्रमात  नेहमी तरुणांच्या पाठीवर हात ठेवुन प्रोत्साहन देने, स्वता सहभागी होने व एखादे काम झाले कि शाबासकी देतानाहि मागे न राहने या सर्व गुणांचा "खजिना" म्हणजे एसडी सर उर्फ़ तात्या.
          गावात लग्न असो कि कोणाचे दुःखद निधन असो तेथे 100% सर उपस्थित असतात. काही अपवादात्मक कारणाने हजर नसतील तर त्यांची ऊनीव लगेच जाणवते. प्रत्येक काम पुढे होऊन करने, सहभाग घेणे अशी फार थोड़ी माणसं गावात आहेत त्या पैकी एसडी सर एक आहेत. अलिकडचे महत्वाचे काम म्हणजे श्री सिध्दनाथ मंदिराचे नुतनिकरण व लोकवर्गणी गोळा करने. हे काम करणाऱ्या टीम मध्ये एसडी सर आहेत. नियोजन व पारदर्शकता असेल तर काम उभे राहते हे या टिमने कृतितुन दाखवुन दिले आहे.
        'जीवन' हे एक सातत्य आहे आणि यश अथवा अपयश हे या जीवनप्रवासातले केवळ मैलाचे दगड असतात. या प्रक्रियेत अंतिम अस काहिच नसत. एक गोष्ट अंतिम असते आणि ती म्हणजे सातत्य राखण्याची इच्छा!! आणि त्याच्या जोड़ीला हवा उत्साह आणि स्वतावरचा विश्वास न गमावता वाटचाल करण्याचे धैर्य!! आणि या धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "एसडी सर".
         माझा व सरांचा तसा लहानपणी फारसा संबंध आला नाही. शैक्षणिक कागदपत्राची "ट्रुकॉपी" करन्याच हक्काच ठिकाण म्हणजे एसडी सरांच घर.एसडी सरांकडे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन जबाबदारी होती. मी किंवा कोणीही कागद पत्रांची ट्रुकॉपि करायला सरांच्या घरी गेलो व सर घरात असले तर हातातील काम बाजुला ठेवुन आमचे काम पहिल्यांदा करुण द्यायचे. वेळ नाही, पुन्हा या अस कधीही त्यांच्य तोडूंन एकल नाही. त्याच प्रमाणे आमची शेती व त्यांची शेती डिकन क्षेत्रात जवळ असल्यामुळे त्यांची भेट रानात ( शेतात) जाता येता व्हायची. पण गावातील कोणत्याही लग्न समारंभाला गेलो कि सर असायचे त्याच्याकड़े सूत्र संचालन जबाबदारी असायची, मला नेहमी वाटायचे मला पण सरांनसारख माईक वर बोलायला जमले पाहिजे, पण धाडस व्हायचे नाही. पुढे कॉलेजला गेल्यावर (2000-2001 पासुन) व जसे गावात श्रीशिवप्रतिष्ठान चे काम चालु झाले (2007 पासुन) तसं सरांच मंदिराजवळ भेटन व बोलणं वाढत गेल. प्रत्येक वेळी सरांनी प्रोत्साहनच दिले. नोकरी निमित्त मी गेल्या सात वर्षापासुन सुरवातीला पुणे व नंतर 2011 पासून नाशिकला असल्यामुळे गावी येन-जाणं महिन्या-दोन महिन्यातुन होऊ लागलं. पण सरांचा उत्साह बघितला कि नेहमी वाटत असत कि आपन हि काही सामाजिक भान जपुन काम केल पाहिजे. कस्तुरी मृगाला जशी स्वतातील कस्तुरी सुघंदाची जाणीव नसते व ते तो सुघंद इकडे तिकडे शोधत असते नेमके तसच काहिस माझ्या सारख्या तरुणांच होत, गावात सरांसारखी काही मानस आहेत पण तरुण त्यांचा आदर्श घेत नाहीत याच दुःख होत. 75 व्या वर्षी अरोग्यपुर्ण जीवनमान, नेहमी काहीतरी कामात स्वताला गुंतवुन ठेवणे ही प्रेरणा सरांकडुन मला व तरुणांना मिळत आहे. अलीकडेच दीपवालीच्या सुट्टीमध्ये मी, माझे मित्र महेंद्र काशिद व सर यांचे गावातील गणपती मंडळे व त्यांची आजची कार्यशैली यावर बराच वेळ चरच्या झाली. स्वता सहभागाशिवाय काम वाढत नाही किंवा आपन इतरांना काम सांगु शकत नाही अस सरांच मत त्यांनी आम्हाला पटवुन दिल आणि हे खरे आहे.
 समुद्रातील गलबताला योग्य दीशा मिळावी त्याला किनारा कुठे आहे हे समजावे म्हणुन दिपस्तंभ असतो, आयुष्यरूपी समुद्रात प्रवास करताना एसडी सरांनसारखा दीपस्तंभ आयुष्याला योग्य दिशा देतो.
सर त्यांच्या कुटुंबासाठी कुटुंबवत्सल व गावासाठी मागर्दर्शक आहेत. सरांबद्दल लिहायला व बोलायला अनेक विषय आहेत, पण थांबतो.
समाज्याची कामे कसण्यासाठी त्यांची शताब्धी साजरी होवो, अस माझ व माझ्या परिवाराच देवाकडे मागनं आहे व राहील. सरांना 75 व्या वाढदिवसाच्या माझ्या परिवराकडुन हार्दिक शुभेच्या!!
आपला नम्र
संदिप रामचंद्र चव्हाण.

(वरील लेखात सुरवातीच्या दोन प्यारेग्राप मधील संदर्भ इतर वाचनात आलेल्या लेखातील वापरले आहे)

No comments:

Post a Comment